लहान मुले ही देवा घरची फुले असतात, त्या फुलांची तळहाताच्या फोडाप्रमाणे काळजी घेणे हे आपल्या प्रत्येकाचे काम आहे, खास करून आई-वडिलांची. परंतु, समाजात अशी काही मुले असतात ज्यांना आई-वडील नाहीत, नातेवाईक ज्यांचा सांभाळ करत नाहीत किंवा त्यांचे पालक त्यांचा सांभाळ करू शकत नाहीत. अश्या मुलांना कुटुंब म्हणजे काय ? प्रेम म्हणजे काय ? हे समजने गरजेचे आहे व त्यांचा योग्य सांभाळ करून त्यांच्यावर चांगले संस्कार करणे गरजेचे आहे.
दादासाहेब इधाते प्रतिष्ठान संचलित दिशा आधार केंद्र गेल्या १० वर्षांपासून अश्या निराधार मुलांना आधार देण्याचे काम करीत आहे, फक्त आधारच नाही, तर त्यांची योग्य देखभाल ठेऊन त्यांना शैक्षणिक, सामाजिक, संस्कृतिक, क्रीडा अश्या विविध क्षेत्रात उंच झेप घेण्यासाठी मदत करत आहे व त्यांचा सांभाळ करत आहे तसेच त्यांचा योग्य वाढीसाठी पोषक असलेले वातावरण प्रदान करत आहे.
अधिक माहिती